शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं, त्या शेवटच्या मेसेजने खळबळ

मुंबई | मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (Shivsena) आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने 17 एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

कुडाळकर यांच्या पत्नीचे नाव रजनी असं आहे. ही घटना कुडाळकर यांच्या राहत्या घरात घडली होती. रजनी यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मुलाला केलेला मेसेज आता समोर आला असून, यात एका महिलेच्या नावाचा उल्लेख आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.

रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला एक मेसेज केला होता. हा मेसेज पोलिसांनी (Police) मिळाला आहे.

त्यांनी एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला होता. माझं काही बरंवाईट झाल्यासं ही महिला जबाबदार असेल, असं त्यांनी म्हटलं होत.

ही महिला रजनी यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची शक्यता समोर येत आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामुळं या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

दरम्यान, रजनी कुडाळकर यांनी 17 एप्रिलला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

रजनी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप उघड झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या- 

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला समजावून सांगावं, नाहीतर…”