मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपातील अंतर्गत राजकारण यात उदयनराजेंची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले नामदेवराव जाधव यांनी उदयनराजेंना वंचितमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.
उदयनराजेंची होणारी घुसमट आम्हाला पाहवत नाही तुम्ही त्यांच्या बाजूने या ज्यांना तुमची गरज आहे. वतनदार तुमचा मान सन्मान ठेवत नव्हते आणि यापुढेही ठेवणार नाहीत म्हणून तुम्ही उपेक्षित वंचित घटकांच्या बाजून यावं जिथं तुमच्यासाठी जिव ओवाळून टाकणारी हजारो लाखो जिवाभावाची माणसं आहेत, असं नामदेवराव जाधव यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
राजेपणाचा आव न आणता उदयनराजे सहजरित्या सामान्य माणसांसोबत वावरताना दिसतात. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात न जाता स्वत:चा पक्ष स्थापन केला असता तरी त्यांच्या मागे उभा महाराष्ट्र उभा राहील, असंही नामदेवराव जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उदयनराजेंना पक्ष स्थापन करायचं नसेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा, 87 टक्के उपेक्षित समाज तुमच्या मागे ठामपणे उभा राहील. तुम्ही वंचितमध्ये आलात तर साताऱ्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास नामदेवराव जाधव यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात पावसाचे थैमान; भिंत कोसळून पाच जण ठार – https://t.co/teICp9hTja #punerains #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना 26 सप्टेंबर रोजी सुट्टी- https://t.co/dBu3XgKLLs #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
सलग आठव्या वर्षी मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय! – https://t.co/ZH5DQGIMNp #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019