Top news कोरोना क्राईम

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा प्रकारे केली पोलखोल

नागपूर| देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.

राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अशा संकट काळात एकीकडे कोरोना योद्धा अहोरात्र मेहनत घेत असतानाच दिसरीकडे अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

अशातच नागपूरमध्ये अशाच एका भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावणाऱ्या ढोंगी बाबाचे कारस्थान नागपूर पोलिसांनी उघडे केले आहे.

शुभम तायडे नावाचा हा बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता. अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात असं म्हणत तो लोकांना मूर्ख बनवत होता. आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावणाऱ्या ढोंगी बाबाचे कारस्थान एमआयडीसी पोलिसांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने उधळून लावले.

बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो व स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. मात्र नागपूर येथील स्थानिक पोलिसांनी तसेच अंनिसने बाबाच्या घरी पोहचून या भोंदूबाबा अटक केली.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हा भोंदूबाबाचा पंचशीलनगर येथील स्वत:च्या घरी दर गुरुवारी दरबार थाटत होता. गुरुवारी 13 मे रोजी सापळा रचत पोलिसांनी रात्री 9 वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे, राज्यात टाळेबंदीबाबतचे कठोर निर्बंध असतानाही यावेळी तेथे 50 च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले.

या भोंदूबाबाला महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा 2013 नुसार अटक करण्यात आली आहे.

भोंदूबाबाला अटक केल्यावर त्याच्या भक्तांनी त्याला सोडण्यासाठी गर्दी करत पोलिसांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना समजावून सांगण्यात आले. तेव्हा भक्तांची गर्दी कमी झाली.

दरम्यान, गेल्या काही काळापासून अशा विचित्र घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी.

महत्वाच्या बातम्या – 

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली…

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले…

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात…

चक्क कोंबडाही बोलतोय अल्लाह अल्लाह; पाहा व्हायरल होणारा…

कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून…