नागराज मंजुळे-रितेश देशमुख घेऊन येणार शिवाजी महाराजांची ‘महागाथा’; टीझरद्वारे घोषणा

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची औपचारिक घोषणा केली आहे.

नागराज मंजुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत, तर अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहेत. रितेश देशमुख यात महाराजांच्या रुपात दिसणार आहे. मंजुळे यांनी 30 सेंकदाचा टीझर प्रदर्शित करुन याबाबतची घोषणा केली आहे.

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…, असं म्हणत मंजुळे यांनी याबाबतची माहिती दिली. आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी शिवाजी…राजा शिवाजी…छत्रपती शिवाजी…चित्रपट, असं ट्विट त्यांनी केली आहे.

नागराज मंजुळे यांनी शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छाही शिवभक्तांना दिल्या आहेत. दरम्यान, हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित होणार असून चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शिवजयंतींच्या शुभमहुर्तावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

-विखे पाटलांच्या फ्लेक्सवरून भाजप गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

-64MP कॅमेरा असलेला शाओमीचा हा लोकप्रिय फोन झाला आणखी स्वस्त!

-माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार असतील- तृप्ती देसाई

-“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”