देश

“नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”

गांधीनगर | नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे कोरोना विषाणू गुजरातमध्ये पसरला, असा आरोप काँगेसनं केला आहे. तसेच याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गुजरात काँग्रेसनं केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं जानेवारीमध्येच कोरोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन त्याचवेळी आरोग्य संघटनेनं केलं होतं. मात्र आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

मोठ्या कार्यक्रमामुळे हजारो परदेशी नागरिक अहमदाबादला आले आणि त्यामुळे कोरोना पसरला. त्यामुळे यासंदर्भात आम्ही गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, असं  गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोनाचा महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातला मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये 20 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता.

महत्वाच्या बातम्या-

-दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करावा; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना

-पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा

-खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील

-मुंबईतील ‘या’ 18 वर्षीय तरुणाच्या कंपनीत रतन टाटांकडून गुंतवणूक

-पक्षाला ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना तिकीट दिलं; उमेदवारी डावलल्यानंतर खडसेंचं आक्रमक रूप