टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार

पुणे | शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Bhangire) यांनी स्वखर्चाने हडपसर महापालिका (Hadapasar) क्षेत्रात एक उद्यान बांधले. त्या उद्यानाला एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उद्यान (Chief Minister Eknath Shinde Garden) नाव दिले. त्यानंतर त्यांच्या या निर्णायाला सर्व स्तरांतून विरोध केला गेला.

एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते या उद्यानाचा लोकार्पण सोहळा करणार होते. परंतु होणाऱ्या टीकांमुळे त्यांनी हा समारंभ रद्द केला.

त्यांनी पुण्यात आल्यावर माझे नाव उद्यानाला का दिले? धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यायचे होते. भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांचा हा आदेश पाळला आणि तात्काळ नाव बदलण्याला सुरुवात केली.

त्यामुळे आता महापालिकेतील या उद्यानाला ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’ (Dharmaveer Anand Dighe Garden) असे नाव देण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी सर्व शासकीय हालचाली सुरु झाल्या असून सायंकाळपर्यंत हे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची चिन्हे आहेत.

महापालिकेने उद्यानांच्या नावांसंबंधी 24 जुलै 2004 रोजी एक अध्यादेश (GR) जारी केला होता. त्यानुसार उद्यानांना नावे देताना वैयक्तित नावे देता येत नाहीत, राष्ट्रीय नेते, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे देण्यास परवानगी आहे.

या ठरावाला आणि अध्यादेशाला शिंदे यांच्या गटातील नगरसेवकाने केराची टोपली दाखवत उद्यानाला परस्पर मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव दिले. त्यामुळे शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका होत होती.

आता त्यांनी चूक सुधारली असून, शिंदे गटाचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री उद्य सामंत (Uday Samant) यांनी नाना भानगिरे यांच्यासोबत संपर्क करत उद्यानाच्या नावात बदल करुन घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –

“भाजपमध्ये गेलेल्यांवर ईडीची कारवाई झालेली दाखवा आणि लाख रुपये मिळवा”

“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”

“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर

‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या