बीड | शरद पवार बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे 5 उमोदवार जाहिर केले होते. त्यापैकी केज मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा भाजपच्या वाटेवर आहेत.
नमिता मुंदडा यांनी परवा(शनिवार) एक फेसबुक पोस्ट लिहीली. त्यावर राष्ट्रवादी पक्षाचं कोणतही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे त्या राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
भाजपच्या संभाव्य उमेदवार संगिता ठोेंबरे यांच्यावर बीडमधला भाजपचा एक गट नाराज आहे. त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी त्यांची पक्षाकडे आग्रही मागणी आहे.
नमिता मुंदडा यांच्या सासू म्हणजेच विमल मुंदडा या आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या आरोग्यमंत्री राहिल्या.नमिता यांचे पती अक्षय मुंदडा हे देखील सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. एकुणच मुंदडा कुटुंबाची मतदारसंघात पकड मजबूत आहे.
दुसरीकडे पंकजा मुंडे आणि मुंदडा कुटुंबाचे संबंध विरोधात असताना देखील चांगले होते. तर एकत्र असतानाही अक्षय मुंदडा आणि धनंजय मुंडे-बजरंग सोनावणे यांच्यात वाद आहेत. याच पार्श्वभूमीवर नमिता भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजप देखील ठोंबरेंचा पत्ता कट करून त्यांना उमेदवारी देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नमिता यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित झाला असल्याचं बोललं जात आहे.
नमिता मुंदडा यांची फेसबुक पोस्ट-