पाटणा | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या अकाली एक्झिटने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. नुकतंच अभिनेता नाना पाटेकर यांनी सुशांतच्या कुटुंबियांची त्याच्या पाटण्यातील घरी जाऊन भेट घेतली आहे.
लष्कराच्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी नाना पटन्यातील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर गेले होते. यावेळी नानांनी आर्मी ड्रेसही परिधान केला. शिवाय अनेक चाहत्यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पाटेकर हे राजीव नगरच्या सुशांतच्या गावी पोहोचले आणि सुशांतच्या निधनावर दुःख व्यक्त केलं.
काही दिवसांपूर्वी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही घरी कुटुंबियांची भेट घेण्यास पोहोचली होती. याशिवाय आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे देखील सुशांतच्या घरी पोहोचले. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी देखील सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं.
बॉलिवूड क्षेत्रातील मनोज तिवारी, पवन सिंह, खेसारीलाल यादव, राकेश मिश्रा, गायक-अभिनेता अक्षरा सिंह या दिग्गज अभिनेत्यांनीही सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…
-शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…
-यंदा गणेशाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय