मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटावरुन राज्यात पुन्हा एकदा मोठं राजकारण पाहायला मिळतंय. या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पाटेकर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आताही Why I killed Gandhi या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर नाना पटेकरांनी आपलं मत मांडलं आहे.
‘मीही ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा प्रश्न आहे. यापेक्षा महत्वाचे विषय सध्या समाजात आहेत. त्यावर बोलणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तो काळ असा होता जेव्हा मी कलाकार म्हणून स्वत: ला सिद्ध करत होतो. वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करत होतो. हिंदी चित्रपटासाठी ही भूमिका माझ्यासमोर आली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, ‘ही माझ्या वैचारिक भूमिकेच्या विरोधातली भूमिका आहे. मी या भूमिकेचं कुठेही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
त्यावेळी मला सांगण्यात आलं की कोर्टामध्ये-चौकशी आयोगासमोर नथुरामने जे स्टेटमेंट दिलंय तेच स्टेटमेंट तुम्हाला या भूमिकेच्या माध्यमातून मांडायचं आहे. पब्लिक डोमेनमध्ये असलेली गोष्टच जर मला सगळ्यांसमोर मांडायची आहे, तर तेव्हा मला खरोखर असं त्यावेळी वाटलं नाही की मी त्या विचारधारेचं उदात्तीकरण करतोय, असंही अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!
“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो”
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
पुण्यातील डॉक्टरने लेकीच्या लग्नाचा खर्च वाचवत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारलं घर!