“मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का?”

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

चंद्रकांत पाटलांनी तर पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, त्याला आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल तसेच. भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यात सत्य समोर येईल. पंतप्रधान पदाची गरीमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे. त्यामुळे त्यांनी हे सुरू केलं आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

नाना पटोलेंविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करत आहे, त्यावरूनही नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला आहे. यातील काही जण कोरोना पॉझिटिव्ह होते, ते आंदोलनात आहेत, पंतप्रधान मोदींनी गर्दी टाळण्याचं, कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. हे पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, मग कसले मोदी भक्त? असा सवाल पटोलेंनी विचारला आहे.

मी जीवे मारेन असे म्हटलं नव्हतं, मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का? असे म्हणत भाजप नेत्यांच्या बुद्धीची किव येते, अशी खिल्ली नाना पटोलेंनी उडवली आहे.

दरम्यान,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. तर मुंबई भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना निवेदन देत कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पटोलेंवर जोरदार टीका करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं 

गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी; कोरोना लस घेण्याबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका 

“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?” 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका