नागपूर महाराष्ट्र

जोर का झटका जरा धीरेसे देऊ; भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात- नाना पटोले

गोंदिया |  विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. भाजपकडून सातत्याने आघाडीचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जातोय. आता मात्र काँग्रेस भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

भाजपचे काही मंत्री आणि आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. जोर का झटका जरा धीरेसे देऊ, असं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे.

संपर्कात असलेले आमदार आणि मंत्री लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. पण जोर का झटका जरा धीरेसे देऊ, असं म्हणत त्यांनी भाजपचे कोणते मंत्री आणि आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, याबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसमुक्तीचा नारा देण्यात आला आहे. मात्र वास्तविकता वेगळी आहे. दुसऱ्याचे घर भाड्याने घेऊन भाजप त्यावर आपल्या पक्षाचा झेंडा लावत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही मुद्द्यावरून मतभेद नाहीयेत. निवडणूक एकत्र लढली जाईल. येत्या 15 दिवसांत जागावाटपाबाबतची सगळी चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काही जागांची अदलाबदल होणार असल्याचे संकेतही नाना पटोले यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आमदार फोडण्यासाठी भाजप लालच दाखवतं; ममता बँनर्जींचा आरोप

“आम्ही गटारं अन् शौचालयं साफ करायला खासदार झालो नाही”

-अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

-“आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी”

-रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय??- बच्चू कडू

IMPIMP