मुंबई | राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. विविध मुद्द्यांवरून भाजपनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात गेल्या 10 महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. भाजपनं या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
काॅंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर आता काॅंग्रेसच्या एका नेत्याची वर्णी लागणार आहे. पण तो कोण आहे हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सरकारमध्ये बऱ्याच गोष्टींवरून वाद झाले आहेत. आताही विधानसभा अध्यक्षपदावरून वाद होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आधिच राजकारण पेटलं असताना आता यामध्ये आणखीन एका मुद्द्याची भर पडणार आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून पुन्हा राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे.
राज्यपालांना विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात पत्राद्वारे माहितीस्तव कळवण्यात आले आहे. मात्र त्यावर कोणतंही उत्तर आलेले नाही. त्यांचं उत्तर नाही आले तरी ही निवडणूक होईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
नाना पटोले यांच्या या भूमीकेनं राज्यपाल विरूद्ध सरकार असा सामना पुन्हा रंगणार अशी चर्चा सुरू झाली आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, 27 आणि 28 तारखेला विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. परिणामी विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर