“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?”

परभणी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh koshyari) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का? आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागणार आहे. राज्यपाल फार मोठं बोलून गेले. आता जागे होण्याची गरज आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. ते परभणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सावित्रीबाई फुलेंनी या देशातील महिलांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्याबद्दल जर राज्यपाल अपशब्द वापरत असतील तर ती तुमच्या आमच्यासाठी गंभीर आहे. म्हणून आता जागे व्हायला पाहिजे, असं नाना पटोले म्हणालेत.

ज्या काँग्रेसच्या भरोशावर अनेक वर्ष राजकारण केलं, त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, पुन्हा एकदा गांधी परिवाराच्या नेतृत्वात, देशामध्ये सत्ता बदल घडणार आहे. त्यामुळे आम्हाला कोणी सल्ला देण्याची गरज नाही, असं पटोले म्हणाले.

पुण्यात सावित्रीबाई फुलेंबद्दल राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय.

यावेळीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, (थोडंसं हसतात) तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… (हसतात) एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडी प्रचंड आक्रमक झाली.

महत्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….” 

“परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो”

पोस्टाची भन्नाट योजना! फक्त 95 रूपये गुंतवून मिळवा तब्बल 14 लाख

मार्केटमध्ये बंपर सेल सुरु, ‘या’ गाड्यांच्या किंमती झाल्या फारच कमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! होळीपूर्वी सरकारने दिलं ‘हे’ खास गिफ्ट