“दोस्ती करायची तर प्रामाणिक करायची अन् दुश्मनी करायची तर…”

मुंबई | भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपच्या नाराज गटाच्या मदतीने अध्यक्षपद मिळवलं, तर गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना धक्का देत भाजपच्या मदतीने सत्तेत वाटा मिळवला. आता यावरून नव्या वादाला सुरूवात झालीये.

राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असंही नाना पटोले म्हणालेत. नाना पटोलेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

दोस्ती करायची तर प्रामाणिक करायची अन् दुश्मनी करायची तर तीही समोरून, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला. येथे भाजपचे चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेस पक्षाला साथ दिल्याचं पाहायला मिळालं.

या प्रयोगामुळे काँग्रेसकडे परिषदेचं अध्यक्षपद आलं. तर चरण वाघमारे गटाला परिषदेचे उपाध्यक्षपद मिळालं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना” 

मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा 

ह्युंदाईची जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार, पाहा लूक आणि फिचर्स