“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे.

जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे, असं पटोलेंनी सांगितलं आहे.

नाना पटोले भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

सरकारमध्ये (mahavikas aghadi) मतभेद निर्माण केला जात आहे. पण यांच्या काळ्या जादूचा फरक पडणार नाही. त्यांची सत्तेवर काळी नजर आहे. पण या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल, असं नाना पटोले म्हणालेत.

दरम्यान, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले आणि सावित्रिबाई यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलं पण त्यांचा अपमान करण्याचं धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहप करणार नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं.

ओबीसी समाजासाठी मी सदैव संघर्ष करत आलो आहे आणि आपलं हक्क मिळवण्यासाठी यापुढेही संघर्ष करत राहू, असं नाना पटोले म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं 

“भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना घेऊन जातात, त्यामुळे…” 

सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव