नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी रविवारी उस्मानाबाद येथे एक भाषण केले. यावेळी त्यांनी वादग्रस्त भाषा वापरली होती.

सावंत यांनी मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारला (MVA) धारेवर धरले होते. मराठ्यांना देवेंद्र फडणवीसांनी 2017 साली आरक्षण दिले, असे सावंत म्हणाले होते.

तसेच यावेळी त्यांनी कमरेखालील शब्दांचा वापर केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खुलासा करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे,

तसेच तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी, असे देखील पटोले म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष काम करत असल्याचे पटोले म्हणाले.

मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले होते.

परंतु त्यानंतर सत्तापालट झाला. आणि नव्याने आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आज देखील हा प्रश्न सुटावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील मंत्री अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“…तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला कळेल”; शशी थरुर यांची स्पष्टोक्ती

‘नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका’

‘या’ योजनेत महिन्याला 95 रुपये भरा आणि व्हा लखपती

‘सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील सभेत गोंधळ’

राजस्थानात 90 आमदारांनी काँग्रेसला राजीनाम्याची धमकी दिली; केली ‘ही’ मोठी मागणी