विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध निवडून आले.

महाविकासआघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले तर भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मी चर्चा केली, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्राची ही परंपरा आहे, ती कायम राहावी, यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-