Top news महाराष्ट्र मुंबई

जर मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर…; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | काँग्रेसमध्ये सध्या खांदेपालटाच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल. राष्ट्रीय नेते जी जबाबदारी देतील, ती मी पार पाडेन. ही वेळ राजकारण करण्याची नाही. मिळेल ती जबाबदारी स्वीकारेन, असं पटोले म्हणाले.

नाना पटोले यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर आक्रमक आणि ओबीसी नेतृत्व नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, नाना पटोले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गेले होते. परंतू त्यांची ही भेट होऊ शकली नाही. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर आपण भेटू, असं राहुल गांधींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या संकटकाळात राज्यपाल कोश्यारींनी घेतला मोठा निर्णय

-आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी

-अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल

-छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा