“देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?”

मुंबई |   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आ.रोप केले आहेत. त्यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

याच मुद्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी महाविकास आघाडीवरही अनेक आ.रोप केले आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

भाजपनं सुरू केलेला आ.रोपाचा सपाटा राज्य सरकारची नाही, तर महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे. त्यांच्या आ.रोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपने आजवर केलेल्या आ.रोपांच काय झालं याचा इतिहास पाहिला, तर खोटे आ.रोप करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यात घडतं असलेल्या घडामोडींवर काँग्रेसची भूमीका स्पष्ट केली.

फडणवीस दिल्लीला जाऊन सीडीआर देतात. पुरावे देतात. पण मुळात फडणवीसांकडे हे पुरावे आलेच कसे? राज्यात एटीएसनं अतिशय योग्य प्रकारे तपास करत असताना. विशेष म्हणजे हा तपास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच एनआयए कोर्टात जाऊन तपास स्वता:कडे घेतं.

देवेंद्र फडणवीसांनी आ.रोप केले म्हणून प्रत्येकाला दो.षी ठरवून राजीनामा घेत बसायचं का? देेवेंद्र फडणवीस म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

अवैध पद्धतीनं सीडीआर मिळावल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांची चौकशी केली जाणार का?, असा सवाल पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारला होता. त्यावर राज्याच्या गोपनियतेला धोका पोहचवण्याच्या गोष्टी पुढे येत असतील आणि एक राज्य म्हणून ते धो.कादायक ठरत असेल, अवैध पद्धतीनं काही घडत असेल, तर काँग्रेस पक्ष नक्कीच अशा लोकांची चौकशीची मागणी करेल, असं म्हणत नाना पटोले यांनी सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान,  आता विरोधी पक्षात गेलेले भाजपचे नेते काय धूतल्या तांदळाचे आहेत का? यांच्या काळातही अनेक घोटाळे झालेत. भाजप वाल्यांनी तर उंदरांनाही सोडलं नाही. उंदीर घोटाळे, चहा घोटाळे यांसारखे घोटाळे भाजप काळात झाले असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘दबंग’ खानच्या कुटुंबातील ‘ही’…

“देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींपेक्षा मोठे नेते झाले…

जमिनीवर बसलेल्या बाळाला माकडानं घेतलं कुशीत…

“एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीसांची जुनीच पद्धत…

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली…