मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा राज्यपालांवर टीका केली आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात ‘भाजपाल”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी आधी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना आता माघारी जावं लागेल, असं नाना पटोले याआधी म्हणाले होते.
आम्ही त्याबाबत कायदेशीर तपासणी करत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष राज्यपालांना आवडत नाही त्यामुळे ते सभागृहातून निघून गेले, असं नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान,(Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत.
त्यांच्या विरोधातील हा सूर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही दिसून आला. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या-
कारने जाताना रस्त्यातच अचानक रॉकेट हल्ला; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
Audi खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का; कंपनीने केली ‘ही मोठी घोषणा
‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांना मोठा फटका; आता ‘या’ गोष्टीही महागल्या
‘कोरोना महामारी संपली नाही’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा