“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

मुंबई | गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अशात काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून आज काँग्रेसने हल्लाबोल रॅली काढलीये. रत्नागिरीतून या आंदोलनाला सुरुवात झाली.

केंद्र सरकारच्या इंपिरीअल डाटा न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचा राजकीय आणि सामाजिक आरक्षण कमी केलं. सातत्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारला डाटा देण्याची मागणी केली.

या सगळ्या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय सामाजिक आणि उद्याच्या काळात आरक्षणच कमी करायचं धोरण केंद्र सरकारने सुरू केलं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

मोदींवर टीका करताना, भाजपच्या भाषणातून काँग्रेसचे नाव गेलं तर यांना कोणी विचारणार नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला जातोय. मोदी सरकारने 8 वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा भूकंप कुठला असूच शकत नाही, असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी मोदींवर केला आहे. आपला देश चीनच्या ताब्यात चाललाय. सुनेचे दिवस येतील. सासू सारखा त्रास दिला तर त्रास होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय राउत यांनी काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रात 2024 मध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि मावळ्यांचे सरकार येईल असा विश्वास काँग्रस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या- 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम