मुंबई | शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) परवानगी नाकारली होती. त्या निर्णयाला शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान केले होते.
यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकांवरील सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने शिवसेनेला हिरवा कंदील दाखविला.
शिवसेनेेने न्यायालयातील लढाई जिंकली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शिवसेनेच्या मित्रपक्षांनी देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपचे अनेक नेते सध्या काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे देखील पटोले म्हणाले. ते अकोल्यात (Akola) बोलत होते.
राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी होतो. जो बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून होत आला आहे.
काँग्रेसच्या (Congress) राजवटीत ते काँग्रेसवर टीका करायचे, तरी देखील जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला होता आणि आहोत. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे नाना पटोले म्हणाले.
पण सध्या जे नवीन हिंदूहृद्यसम्राट झाले आहेत, तेच हिंदूंच्या व्यवस्थेला आणि शिवसेनेच्या परंपरेला विरोध करताना दिसत आहेत आणि आपण पाहत आहोत. यावेळी पटोलेंनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील धारेवर धरले.
पटोले म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, यांचेच आमदार गणेशोत्सवात बंदुका चालवित होते. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?
भाजपात प्रवेश करणार का? एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा; वाचा सविस्तर वृत्त
मुस्लिम नेत्यांच्या मोहन भागवत भेटीवर असदुद्दीन ओवेसी संतापले; म्हणाले, हे सर्व मुसलमान उच्चभ्रु …
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे; वाचा सविस्तर वृत्त