“मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही”; नानांचं भाजपवर टीकास्त्र

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद पेटला आहे. राज्यात विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात वातावरण पेटलं आहे. राज्य सरकारवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.

भाजपच्या आमदारांचं निलंबन करताना विधानसभेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव बसले होते. त्यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी यानी या निर्णयानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यानं राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला होता की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होणार नाही. त्यामुळे आता अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशात ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. नानांनी भाजपच्या सदस्य नोंदणीवरही जोरदार टीका केली आहे.

ज्या काही निवडणुका झाल्यात त्यात अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. परिमाणी येणाऱ्या काळात आम्ही योग्य ती भूमिका घेणार आहोत, असं नाना म्हणाले आहेत

काँग्रेस डिजिटल मेंबरशीप करणार कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना काँग्रेसचा विचार सांगणार आणि सदस्य करून घेणार, बोगस नाही. मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या टिपू सुलतान प्रकरणावरूनही जोरदार वाद चालू आहे. अशात आता या आमदारांच्या निलंबनाच्या वादाची भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…