मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत विधिमंडळात सुरू झालं आहे. राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून वातावरण तापलेलं असताना ईडीच्या कारवाईचे पडसाद अधिवेशनात देखील उमटत आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अधिवेशनात गोंधळ चालू असताना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात लातूर जिल्हा भाजपच्या नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं खळबळ माजली आहे.
लातूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या कामगिरीवर खूश होवून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघातील नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.
सध्या लातूरच्या विधानसभा जागांवर भाजप दोन, काॅंग्रेस दोन, राष्ट्रवादी काॅंग्रेस दोन असे आमदार आहेत. लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धिरज देशमुख आमदार आहेत.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती आणि निलंग्याचे माजी नगराध्यक्ष अशा दोन महत्त्वाच्या नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना पटोले यांनी लातूर पॅटर्नचं कौतूक केलं आहे.
भाजपमुक्तीचा लातूर पॅटर्न राज्यभर राबवण्यात यावा, अशा सुचना पटोलेंनी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निलंगा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व भाजप आमदार संभाजी पाटील हे करतात. सदरिल पक्षप्रवेशाचा पाटील यांनी धक्का बसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील अंतर्गत वादाचा भाजपला फटका बसल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू”
घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर
फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!