मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये ओबीसी आरक्षणावरून सध्या जोरदार वाद रंगला आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून जोरदार टोलेबाजी केली आहे.
इम्पिरिकल डाटा, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभं ठाकले आहेत.
फडणवीसांनी बोलताना काॅंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर फडणवीसांच्या आरोपांना नानांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली आहेत.
फडणवीसांनी आरोप लावला की आमच्या जवळचे डोंगरे देखील ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत, फडणवीस खोटे बोलत आहेत, असं पटोले म्हणाले आहेत.
ओबीसी आरक्षणाला ग्रहण देखील फडणवीस यांच्या सरकारमुळं लागलं आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.
इम्पिरिकल डाटा दिला जात नाही म्हणून अडचण आली आहे. आरक्षणाशिवाय भारत पाहीजे असं वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन भागतव यांनी केलं होतं, असंही पटोले म्हणाले आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणात जवाब नोंदवण्यासाठी नाना पटोले आले होते. यावेळी नानांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. नानांच्या टिकेनंतर आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास
सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला
IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले