मुंबई | स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी आंदोलन सध्या समाप्त झालं आहे. पण या आंदोलनाचे परिणाम देशाच्या राजकीय आणि सामजिक क्षेत्रावर झाले आहेत.
तब्बल एक वर्षभर चाललेल्या तीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनानं प्रचंड बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला देखील मोठा हादरा दिला आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या 700 हून अधिक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यावरून देशात राजकारण पेटलं आहे. अशातच आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या एका वक्तव्यानं देशात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
सत्यपाल मलिक यांनी त्यांच्यातील आणि मोदींमधील संभाषण जगजाहीर करताना मोदींवर टीका केली होती. त्यांनतर मोदींवर शेतकरीविरोधी असल्याची टीका देशभरातून होत आहे.
सत्यपाल मलिक यांनी पुर्वीपासून शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. आताही त्यांनी शेतकरी आंदोलनातील मृत्यूवरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी आपला आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूचा काही संबंध नसल्याचं वक्तव्य केल्याचं मलिक म्हणाले आहेत.
मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावरून देशात राजकारण तापलं आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे हे आमचं दुर्देव आहे, अशी टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनात 700 शेतकरी तुमच्यामुळंच मेले आहेत. तुम्हीच त्यांचे मारेकरी आहात, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे. परिणामी सध्या केंद्र सरकारवरून राज्यातील नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत आहेत.
शेतकऱ्यांबद्दल मोदींना कळवळा असण्याचं कारण नाहीच. असता तर शेतकऱ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं नसतं. शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणून चिडवलं नसतं, अशी टीका नानांनी केली आहे.
दरम्यान, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अनकेदा मोदी सरकारला घेरलं आहे. परिणामी सध्या राज्यपाल विरूद्ध केंद्र सरकार असा सामना जोरात सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!
कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…
…म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ
अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार