“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”

मुंबई | महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे , राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

सुजय विखेंच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर बाप आहे आणि बापच राहणार, असं प्रत्युत्तर पटोलेंनी विखेंना दिलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘मातोश्री’ला सध्या बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. हे राजकारणासाठी भाजप करतंय. यात मुख्यमंत्र्यांनी कुठे हतबलता दाखवली नाही, असं ते म्हणालेत.

सध्या महाराष्ट्रात भाजपतर्फे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. पण ते ऐकून ऐकून जनतेचे कान बधीर झालेले आहेत. केवळ भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. एकही भ्रष्टाचार सिद्ध होत नाही, असं म्हणत पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

लोकांना काँग्रेस पाहिजे. लवकरच काँग्रेस महागाईविरोधी आंदोलन करणार आहे. भाजपने गरज सरो वैद्य मरो, अशी भूमिका घेतली आणि देशभरात कृत्रिम महागाई केली, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव 

घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय 

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली, पाहा व्हिडीओ 

“25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या ठाकरे कुटुंबाला जेल झालीच पाहिजे” 

‘महिला पुरुषांसोबत पार्कमध्ये दिसल्यास…’; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान