भंडारा | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi स्थानिक पातळीवरील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद, तर भाजपने उपाध्यक्षपद मिळवलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली.
भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला. येथे भाजपचे चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेस पक्षाला साथ दिली.
या प्रयोगामुळे काँग्रेसकडे परिषदेचे अध्यक्षपद आले. तर चरण वाघमारे गटाला परिषदेचे उपाध्यक्षपद मिळालं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर भाजप पुढचे 30 वर्षे सत्तेतून बाहेर जाणार नाही”
पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
नारायण राणेंना दिलासा; न्यायालयाकडून महत्त्वाचा निर्णय जारी
“मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांना धमक्या”