“राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याला दिल्लीचा पाठिंबा आहे का?”

मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत विधिमंडळात चालू झालं आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीतील संघर्ष पहिल्याच दिवशी चालू झाला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर राज्यपालाचं अभिभाषण चालू असताना सभागृहात आमदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरू केली. त्यानंतर राज्यपालांनी अवघ्या काही मिनीटांमध्ये आपलं भाषण संपवलं आहे.

राज्यपालांनी राष्ट्रगीताच्या अगोदर सभागृहातून  बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परिणामी वाद वाढला आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये कार्यक्रमादरम्यान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून अधिवेशनात वातावरण तापलं आहे.

भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याला दिल्लीत बसलेल्या मोदी सरकारचं समर्थन आहे का?, हे भाजपनं स्पष्ट करावं असं नाना पटोले म्हणाले आहेत. राज्यात जे चांगलं काम चालू आहे त्याचा उल्लेख टाळण्यासाठी राज्यपालांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं पटोले म्हणाले आहेत.

भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सातत्यानं महाराष्ट्राच्या महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा राजीनामा घेण्यात यावा, असं पटोले म्हणाले आहेत.

सभागृहाच्या परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यपालांचा राजीनामा घेण्याची गरज असल्याचं मत पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्यांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया का येत नाही, असा सवाल पटोलेंनी भाजपला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  सर्वात मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का

“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”

  आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही