नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधारी असा वाद आपण सगळ्यांनीच पाहिला. तीन चाकी हे सरकार टिकणार नाही अशी टीका वारंवार भाजपकडून करण्यात आली. यात महाविकास आघाडीमध्ये अनेक अंतर्गत मदभेद असल्याचं समोर आलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश प्रदेश काँग्रेसने दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे.

या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी असूनही काँग्रेसने पहिल्यांदा अधिकृत भूमिका घोषित केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले होते. आता पत्राच्या माध्यमातून अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधीही अनेकवेळा नाना पटोले अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वबळावर लढण्याविषयी बोलले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले… 

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 

एकाच दिवशी राष्ट्रवादीला सलग दुसरा झटका; ‘या’ बड्या नेत्यानेही दिला राजीनामा 

पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; वाचा हवामान खात्याचा इशारा