मुंबई | अंमलबजावणी संचालनालयाकडून नागपूरचे वकिल सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. उके यांच्या निवासस्थानावर पहाटे 5 वाजता ईडीचे (ED) अधिकारी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील म्हणून देखील सतीश उके यांची ओळख आहे. सतीश उके यांचे भाऊ प्रदीप उके यांनाही ताब्यात घेतलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहे. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. मात्र, त्याआधीच सतीश यांना उचललं, असा आरोप बंधू शेखर उके यांनी केला आहे.
त्याचबरोबर आता नाना पटोलेंनी देखील या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण यांसारख्या महत्त्वाच्या फाईल्स आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप नानांनी केला आहे.
नागपूरात ईडीचं कार्यालय असताना देखील ही धाड मुंबईच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आली होती. उकेंचा मोबाईल आणि फोन जप्त करण्यात आला आहे, असंही नाना म्हणाले आहेत.
दरम्यान, सतीश उके यांचं तोंड बंद करण्यासाठी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणात सरन्यायाधिशांनी आणि उच्च न्यायलयाच्या न्यायाधिशांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: ना मुंबई ना दिल्ली, मॅथ्यू हेडन म्हणतो ‘हा’ संघ यंदा IPL जिंकेल
IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ
Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने दिलं गुडीपाडव्याचं खास गिफ्ट
पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश