“पाकिस्तानमधून कांदा आयातीची शरद पवारांना ही चुकीची माहिती मिळालीय”

नाशिक | कांदा पाकिस्तानातून आयात होत असल्याची चुकीची माहिती शरद पवार यांना अधिकाऱ्यांकडून मिळाली असावी, असंही ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी  म्हटलं आहे.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या बाजार भावात वाढ होत आहे. येणाऱ्या दिवसात यात आणखी भर पडत कांद्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले.

राज्यासह देशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचे बाजार भाव हे होलसेल बाजाराबरोबर किरकोळ बाजारातही वाढत आहेत. विविध देशांसह पाकिस्तानातून कांदा आयात केला जाणार असल्याची बातमीसमोर आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार टीका केली होती. त्याच्या या टीकेला पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला जो विशेष आयातीसाठी दर्जा दिला होता. तो काढून टाकल्याने तिथून कांदा आयात होऊच शकतच नाही. त्यामुळे पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची ही फक्त अफवा असल्याचं नानासाहेब पाटील म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-