नांदेड | दोन वर्षांपूर्वी अंगावर काटा आणणारी घटना नांदेडमध्ये घडली होती. सख्खी बहिण आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दिगंबर दासरेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भोकर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पूजा दासरे आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची हत्या तिचाच भाऊ दिगंबर दासरेने केली होती. आज या प्रकरणी भोकर न्यायायलाने निर्णय दिला आहे. तर दिगंबर याचा चुलत भाऊ मनोज दासरेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
24 जुलै 2017 ला नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती. या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
पूजा आणि गोविंद या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यांचं हेच प्रकरण तिच्या घरी कळाल्यानंतर पूजाच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या एका मुलाबरोबर लावून दिलं. पण पूजाचा गोविंदवर जीव जडला होता. काही दिवसांतच ती गोविंदबरोबर पळून गेली.
पूजाच्या भावाने त्यांचा मागोवा घेतला आणि पत्ता कळाल्यानंतर पूजाचा भाऊ दिगंबर दासरे आणि चुलत भाऊ मोहन दासरे त्या गावी गेले. त्या दोघांची समजूत काढण्याचं नाटकं केलं. त्यानंतर त्यांना गाडीवर बसवलं आणि वाटेतच त्यांनी त्या दोघांचा गळा चिरून निर्घून हत्या केली.
गळा चिरलेल्या अवस्थेत पूजा लोकांकडे मदत मागत होती. परंतू लोकं फक्त व्हीडिओ काढण्यात मश्गूल होते. त्यांनी पूजाला कोणत्याही प्रकारची मदत केली नव्हती. हत्येनंतर आरोपी दिगंबर स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर झाला होता.
दरम्यान, ही संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर उभा महाराष्ट्र हळहळला होता. पुरोगामी महाराष्ट्राला चीड आणणारी ही घटना होती.
महत्वाच्या बातम्या-