जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात

मुंबई | रतन टाटा आणि नारायण मूर्ती हे भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठी नावं आहेत. मात्र या दोघांनी आपल्या हळव्या मनाचं आणि आपले पाय जमिनीवरच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एका पुरस्कार समारंभात नारायण मूर्तींनी चक्क रतन टाटा यांचे चरणस्पर्श केले आहेत.

टायकाँन पुरस्कार सोहळ्यात रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी इन्फोसीसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी मूर्ती रतन टाटांच्या पाया पडले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

नारायण मूर्ती-रतन टाटा यांच्यात झालेल्या या प्रसंगामुळे या दोघांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला आहे. रतन टाटा 82 वर्षांचे असून मूर्ती आणि त्यांच्या वयात केवळ 10 वर्षाचे अंतर आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही व्यक्तींनी यशाचं कितीही मोठं शिखर गाठलं तरी त्यांचे पाय जमिनीवरच असतात याची प्रचिती यातून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा मो़ठा निर्णय

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-धक्कादायक… स्वारगेटजवळच्या नाल्यात सापडलं अर्भक!

-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

-कुणीही असो गरज पडल्यास चौकशीला बोलावू; चौकशी आयोगाचा फडणवीसांना दणका