मुंबई | शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद वेळोवेळी प्रकर्षाने समोर आला आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी हा वाद समोर आला होता.
उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर चिपी विमानतळाच्या उद्धाटनावेळी देखील नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं.
अशातच आता नारायण राणे यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि गृहमंत्र्यांमध्ये ती धमक आहे का?, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.
देशाचे संरक्षण करणारे देशाची कीर्ती जगभर पोहोचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप पक्ष वाढल्यास महाराष्ट्र नक्कीच विकसित होईल, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
मी आमदार असताना विधानसभा गाजवली होती. एक इतिहास निर्माण केला. कोकणातील बुद्धिमत्ता कशी आहे, हे मी महाराष्ट्रातील आमदारांना दाखवून दिलं, असंही राणे म्हणाले आहेत.
मात्र, सध्याचा इथले आमदार नक्की काय बोलतात, हेच समजत नाही. गावचा सरपंच तरी बरा बोलतो, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्री असताना मुंबईवर गुंडांची दहशद होती. त्यावेळी पाकिस्तानमधून मुंबईवर हल्ले होत होते. असं असलं तरी ती दहशत मी मोडून काढली होती, असंही राणे म्हणाले आहेत.
तुम्ही हक्काने मागा मी पद नक्की देईल. मात्र, गद्दारी केल्यास ते मी सहन करणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
पदासाठी नाही तर आपापसात मतभेद न राहता प्रत्येकाने एकोप्याने काम करा, असा सल्ला देखील नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता
“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”
शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण
मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का