शिवसेनेकडून मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा सेनेवर खळबळजनक आरोप!

पुणे |  ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर खळबळजनक आरोप केला आहे. तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलं आहे. सावंतांनी किती पैसे दिलेत हे सगळ्यांना माहिती झालंय. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून शिवसेनेला शेळी किंवा मांजर म्हटलं तरी हरकत नाही, असा घणाघात राणेंनी केला आहे. 

पुण्यातील इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर एकामागून एक प्रहार केले.

आमदार, मंत्रीपदं पैसे घेऊन दिली जात असल्याने शिवसेना कमजोर झाली आहे. शिवसेनेत वाघ राहिले नसून शेळ्या-मेंढ्या राहिल्या आहेत, असं राणे म्हणाले.

दरम्यान, माझ्या भाजप प्रवेशाला शिवसेनाच आठकाठी घातली आहे. पण मी भाजपत प्रवेश करणारच. तसा शब्द मला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असंही राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-