“महाराष्ट्राच्या इतिहासात इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर कडाडून टीका केली. ईडी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

लोकांचे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा संजय राऊत बोलतो. शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी भाषा नव्हे, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.

तुम्ही 56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कोणी आणली नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.

तुमची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. संजय राऊत यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे, असा आरोप देखील राणे यांनी संजय राऊतांवर यावेळी केला.

उद्धव ठाकरेंना कळत नाहीये की संजय राऊत सुरुंग लावत आहेत. त्यांना माहिती आहे, आज ना उद्या जागा खाली होणार आहे, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या कानपिचक्या दिल्या.

दरम्यान, नारायण राणे यांनी  पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना थेट उत्तर दिलंय. त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध राणे वाद पेटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मॅक्सवेल IPLचे ‘हे’ सामने खेळणार नाही; कारण वाचून तुम्हालाही होईल आनंद

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!

“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”