सिंधुदुर्ग | सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी राणेंवर बोचरी टीका केली होती.
ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंना टोला लगावला.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेलं होतं, असं नारायण राणे म्हणालेत. ते सिंधुदुर्गात माध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
कारभार करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असा टोला नारायण राणेंनी पवारांना लगावला.
महाविकास आघाडी सरकारमधील केलेल्या कारभारात किती अक्कल लावली आहे, हे जनतेला कळून चुकलं आहे, असं म्हणत नारायण राणेंनी अजित पवारांना उत्तर दिलंय.
कोकणात मंजूर निधी आर्थिक वर्ष संपायला 3 महिने शिल्लक आहे तरी 1 रुपया खर्च नाही. हा यांचा कारभार आणि आले मोठे अकलेचे धडे शिकवणारे असं म्हणत राणेंनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला.
मी अजित पवार यांना 100 कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघपाटबंधाऱ्याचं टेंडर काढलं नाही, 13 कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध!
“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो”
नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे
विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण
येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी