“माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई : महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला तर मी या सरकारला सहकार्य करेन. मात्र आकस, सूडबुद्धी आणि जनतेला चांगले दिवस आले नाही तर मग माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही, असं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी राणेंनी नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही  दिल्या.

मी स्वत: कधीही सुडाचे राजकारण केलं नाही आणि माझ्याशीही कुणी सुडाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

मी मूळ बाळासाहेंबाचा शिवसैनिक आहे. जर या सरकारने राज्याच्या हिताचा विचार केला, तर मी या सरकारला सहकार्य करेन, असंही नारायण राणेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मला तिन्ही पक्षांकडून आमंत्रण नव्हतं. माजी मुख्यमंत्री म्हणूनही मला शपथविधीला बोलवण्याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. पण मी या गोष्टींवर नाराज नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-