मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेली मुलाखत म्हणजे घरगुती आणि बालिश; राणेंची बोचरी टीका

मुंबई | राज्यातील सरकार स्थापन होऊन 2 महिने झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला विशेष मुलाखत दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं. त्यांच्या याच मुलाखतीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे

ही मुलाखत राज्याच्या हिताची नाही. 2 महिन्यांत कामं काहीच केली नाही अन् मुलाखत कसली देताय. ही घरगुती आणि बालीशपणाची मुलाखत आहे, असं जोरदार टीकास्त्र नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडलंय.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची दिशा ठरावी म्हणून मुलाखतीत एकही मुद्दा मांडला नाही. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला पण त्यांनी फसवी कर्जमाफी करून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, असं राणे म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करावं, असं आम्हाला नेहमी वाटतं. टीका करण्याचा माझा हेतू नाहीये, असं सांगायलाही राणे विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

-अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत… तसे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

-“ह्या डांबर चोरात किती हिम्मत आहे ते आम्हाला माहीतय, कुठे यायचं सांगा फक्त”

-…तर देश तुम्हाला माफ करणार नाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

-“मनसेच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावं”

-“मनसेच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावं”