“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो”

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जी भाषा वापरायला नको होती, ती वापरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातच नव्हे, तर देशात बेअब्रूही झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे दुर्दैव आम्ही समजतो, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री विरोधकांना ज्या भाषेत बोलतात ती संसदीय नाही. शिवसेना सांगत होती की, सर्व जागा जिंकणार. काय झालं. संजय राऊतच काठावर आलेत. वाचलेत आमच्या हातातून. त्यांना आघाडीची मतं मिळायला हवी होती. तितकीही मते त्यांना मिळाली नाहीत, असं राणे म्हणाले.

तुम्ही महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेलं आहे. त्याचबरोबर सत्तारुढ आणि विरोधकातील संबंध धुळीला मिळवले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सत्तेत राहायचा नैतिक अधिकार नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये.

शरद पवारांनी राज्यसभेचा निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यातून जरा बोध घ्या. चांगल्या चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभवामुळे आम्हाला कोणताही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं. माणसं जपली. आमदार सांभाळले, असं कौतूक शरद पवारांनी केलं आहे, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

तुमचे 10 आमदार फुटतात. याचा अर्थ विश्वासार्हता नाही. स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही आणि बढाया मारतात. आम्ही विरोधात असूनही आमदार एकत्र ठेवले, असा चिमटा राणेंनी शिवसेनेला काढला.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी वाचवू शकलो नाही’ म्हणत त्याने लेकीचा जळालेला पाय पोलिसांकडे नेला; काळीज पिळवटून टाकणारी घटना 

“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील” 

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!