शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेची शान आणि ओळख असलेला शिवाजी पार्क मैदानात होणारा ‘दसरा मेळावा’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात होणार की एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली होणार, हा कळीचा मुद्दा झाला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची, हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) न्यायप्रविष्ठ आहे. त्यातच आता दसरा मेळावा कोणी घ्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या वादावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाष्य केले आहे. राणेंनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे म्हणाले, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हेच यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेतील. तसेच महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस हा शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही.

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कोणते गुण आहेत? त्यामुळे जे घडले, ते योग्य घडले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यामागे अनेक कारणे आहेत, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रावरील विघ्न दूर झाले आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रावर संकंट आले होते. पण आता ते नाही आहे. हे सरकार चांगले काम करत आहे. एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका, ते एकदिवस सगळं बाहेर काढतील, असेही राणे म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने राखून ठेवला आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतर निर्णय घेऊ असे महापालिकायुक्त सपकाळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुण्याला कोणी वाली राहिला नाही, या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे रहाणार का? शशी थरुर म्हणाले…

“ईडीच्या भितीने राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, आणि…”; किशोरी पेडणेकरांची मोठी टीका

झारखंडचे मुख्यमंत्री आणि आमदार छत्तीसगढला अज्ञातस्थळी गेले; सांगितले ‘हे’ कारण

‘पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश