अटकेनंतर नारायण राणेंनी नवाब मलिकांना डिवचलं, म्हणाले…

मुंबई | आज राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राजकारणात चांगलाच वाद पेटला आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

अशातच आता राजकीय वक्तव्यांना पूर आल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आहेत.

अशातच मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर मुख्यत्वे शिवसेनेवर टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री मंडळात D काय आणखी भरपूर कंपनीची माणसे असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. आता ईडी समोर आता बोल म्हणावं नायतर तुझ्या हातात विडी देतील, असा टोला देखील राणे यांनी यावेळी मलिकांना यावेळी लगावला आहे.

नवाब मलिकांच्या यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे आता वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडली.

दरम्यान, आता राजकीय घडामोडींना वेग आल्यानं महाविकास आघाडी कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

“कमळाबाई लाविते काडी, पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना राष्ट्रवादीचा रांगडा गडी”

“कोरोना वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स”