“नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही”

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांनी 2 नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता.

मलिकांनी वानखेडे 50 हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. आता नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप नेते नारायण राणेंनी मलिकांना सुनावलं आहे.

लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला नारायण राणेंनी नवाब मलिक यांना लगावला. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मलिक काहीही बोलतात. रोज उठसूठ आरोप करत आहेत. वानखेंडेवर त्यांनी आरोप केले आहेत. मला म्हणायचंय, दुसऱ्यांचे पँट शर्ट पाहण्यासाठी ते लोकांच्या बेडरुममध्ये जाताच कशाला, अशा शब्दांत राणेंनी मलिकांचा समाचार घेतला आहे.

मला मलिकांना सांगायचं आहे की जरा जपून राहा. तसेच तुमचं काढलं तर महागात पडेल, असा इशाराही नारायण राणेंनी नवाब मलिक यांना दिला आहे.

कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला. यावेळी बोलतान राणेंनी ठाकरे सरकावरही जोरदार टीकास्त्र सोडलंय.

सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत, अशी टीका राणेंनी केलीये.

राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.

हे काय मुख्यमंत्री आहेत का? माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मातोश्रीत बसूनच सर्व काम होतात. महाराष्ट्र पाहा किती प्रगती केली आहे. लोकांच्या हिताचं एक तरी काम केलं का?, असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं- नारायण राणे 

हलगर्जीपणा नडणार?, कोरोनाबद्दल नवी माहिती समोर आल्यानं जगाचं टेन्शन वाढलं 

“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”

कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ