भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं- नारायण राणे

मुंबई | कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत धडका मारायची भाषा करत आहेत. परंतु कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकता, असा टोला खासदार नारायण राणेंनी शिवसेनेला लगावलाय.

दादरा नगर-हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही, असं नारायण राणे म्हणालेत.

तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखही नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलत बसू नये, असंही नारायण राणे यांनी म्हटलंय.

आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, अशी बोचरी टीका त्यांंनी

डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही, असं राणे म्हणाले.

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं, असं म्हणत राणेंनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आले. पुढच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढल्यास इतके आमदार-खासदार निवडून येणार नाहीत, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज ढिंढवडे निघतायत. काय बोलताय, काय करताय?, अशी टीका त्यांनी केलीये.

मुख्यमंत्री बारामतीला गेले. त्यावेळी शेतकरी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यावर बोलावं. काहीच बोलले नाही. नुसती टिंगल टवाळी, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच शरद पवारांकडे लाचार होऊन जाऊन मुख्यमंत्री पद स्विकारलं, असा घणाघात राणेंनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

हलगर्जीपणा नडणार?, कोरोनाबद्दल नवी माहिती समोर आल्यानं जगाचं टेन्शन वाढलं 

“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”

कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ