मुंबई | भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर थेट हल्लाबोल केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्तेत राहण्याचा अधिकारही नाही, असं त्यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटला जात नाहीत. मंत्रालयात जात नाही. काय काम करायचं तेही माहीत नाही. पण नको त्या विषयावर बोलतात. हे काय मुख्यमंत्री आहेत का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता.
मातोश्रीत बसूनच सर्व काम होतात. महाराष्ट्र पाहा किती प्रगती केली आहे. लोकांच्या हिताचं एक तरी काम केलं का?, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत सर्वत्र, अशी बोचरी टीका राणेंनी केलीये.
मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला
कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. संजय राऊतांना लिखाण करताना त्यांना भान राहत नाही, असं म्हणत त्यांनी राऊतांचा समाचार घेतलाय.
रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील, असंही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी ईडी, सीबीआय करत असलेल्या कारवायांवर देखील भाष्य केलं आहे. कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि यंत्रणांना माहिती मिळत असेल तर चौकशी करू नये का? त्या संस्था कशासाठी आहेत? त्यांनी जे काम केलं. त्यात काही सापडलंच ना. संपूर्ण आयुष्यभर नोकरी केली तर पाच दहा लाखाच्या पलिकडे मिळत नाहीत, असं राणे म्हणाले.
हे लोकं सीआरमध्ये खातात, घेतात आणि ठेवतात. त्यामुळे पकडले गेले. चोरी केल्यानंतर सर्वच जण बोंब मारतात. मी काहीच केलं नाही सांगत असतात, असं राणेंनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही”
भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं- नारायण राणे
हलगर्जीपणा नडणार?, कोरोनाबद्दल नवी माहिती समोर आल्यानं जगाचं टेन्शन वाढलं
“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”
कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ