मुंबई | राज्यासह देशात सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने खळबळ माजली होती. आपल्या सदाबहार अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यानं अचानक जग सोडल्यानं सर्वांना धक्का बसला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर मात्र राज्यासह देशात राजकारण तापलं होतं. सत्ताधारी महाविकास आघाडीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. अशातच आता परत एकदा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा उल्लेख करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी ठाकरेंचे स्विय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांना उद्देशून वक्तव्य केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भावनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मिलींद नार्वेकर यांनी राणेंवर ट्विटरवर पोस्ट करत टीका केल्यानंतर राणेंना टीका चांगलीच जिव्हारी लागल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. राणेंनी नार्वेकरांना गंभीर इशारा दिला आहे.
आपल्या वैद्यकिय महाविद्यालयासाठी एकाच दिवसात उद्धव ठाकरेंच्या सहीसाठी सात वेळा फोन केला होतात, असं नार्वेकर राणेंना म्हणाले आहेत. यावर टीका करताना राणेंनी चक्क सुशांत सिंग राजपुत प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
सुशांत सिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय?, अशा किती घटना मी आपल्याला सांगू?, मला बोलायला लावू नका, अशी टीका राणेंनी केली आहे.
दरम्यान, राणेंनी टीका केल्यानंतर आता खूप दिवसानंतर सुशांतसिंग प्रकरण परत एकदा चर्चेत आलं आहे. राणेंचा रोख नेमका कोणत्या फोन काॅलकडे होता?, अशी चर्चा राज्यात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले