मुंबई : शिवसेनेतील इनकमिंग जोरात सुरु आहे. खासदार नारायण राणे यांच्या कट्टर समर्थक आणि चेंबूरच्या माजी नगरसेविका निलम डोळस यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रवेश केला.
निलम डोळस यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नारायण राणेंना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. ईशान्य मुंबईचे प्रमुख कार्यकर्ते हरीश विचारे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत दररोज इनकमिंग होत आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. निलम डोळस स्वगृही परत आल्या आहेत, त्यांचा अनुभव कामी येईल, असं मानखुर्दचे आमदार तुकाराम काते यांनी सांगितलं. शिवाय त्यांचं शिवसेनेत स्वागतही केलं.
ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मुरबाड तालुक्यातील माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सु़भाष पवार यांनी जिल्हा परिषदेचे आठ सदस्य आणि सभापती बाजार समिती, सभापती कल्याण पंचायत समिती यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या-
1 सप्टेंबरपासून देशात होणार ‘हे’ 9 नियम लागू; खिशाला लागणार कात्री! – https://t.co/36QNXqxY4C
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही तर वंचित बहुजन आघाडीशी आहे” – https://t.co/0XbI99y5u9 @Dev_Fadnavis @NCPspeaks @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
जळगाव घरकुल घोटाळा: सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह इतरांना शिक्षा! – https://t.co/S03MKmNdCD #JagaonScame
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019