नारायण राणेंचा मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा???

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय राणे यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्रित येऊ शकतात असं बोललं जात आहे.

मालवण येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान बोलत असताना राणे यांनी आपल्या मागील पराभवाबाबत खंत व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालो. याच मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालो. मात्र, सहा वेळा आमदार राहिलेल्या मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांच्याकडून झालेला पराभव मी कधीही विसरू शकणार नाहीस, असंही नारायण राणेंनी सांगितलं आहे. 

1990 पासून मला 80 टक्केच्यावर मतं मिळत होती. मात्र लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून मतांची 80 टक्के मते कशी मिळवता येतील यासाठी प्रयत्न करा, असं आवाहनही राणे यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी झालेल्या बैठकीत नारायण राणे यांनी मनसेच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात राणे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार

-स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान

-राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे करणार पूरस्थितीची पाहणी

-डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करणार नाहीत!

-“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत