“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

सिंधुदुर्ग |  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं असून एकूण 19 जागांपैकी भाजपने 11 जागा खिशात घातल्या आहेत.

एकूण आठ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवता आलाय. ही निवडणूक काही जागांवर अतिशय अटितटीची झाली आहे. यानंतर गेल्या चार दिवसात कोकणात जो काही राडा झाला त्याची माहिती केंद्र सरकारला दिली जाणार आहे. स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

चार दिवसात काय काय घडला त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं. ते सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलीस कसे वागले, कोर्टात काय झालं आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केलं… जे काही अनुभवायला मिळालं त्याची सर्व माहिती अमित शहांना देणार आहे, असं नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे.  सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे. आता आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार आहोत, असं राणे यांनी सांगितलं.

ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी त्यांना दिलेली साथ या मुळे हा विजय मिळवला, असं नारायण राणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त 

धक्कादायक! मुंबईतील 55 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला ओमिक्रॉन 

‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा